Homeशहर व जिल्हाप्राणघातक हल्ल्याप्रकरणी उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करा; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

पंचवटी – प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात दोघा युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ला सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद आहे. यात भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते आणि त्यांनीच गुंडांना मुलांना बरोबर घेऊन स्वतः त्या युवकांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे. जखमी व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीमध्ये उद्धव निमसे यांचे नाव स्पष्टपणे नमूद असूनदेखील अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही. माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते, राहुल दराडे, दिलीप मोरे, वैभव ठाकरे, मसूद जिलानी, बाळासाहेब कोकणे, संजय गोसावी, आकाश धोत्रे तसेच जखमी युवकांच्या धोत्रे व कुसाळकर परिवारातील सदस्यांनी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांची भेट घेत निवेदन सादर केले.

शिवसेना ठाकरे गट व पिडीत कुटुंबियांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाचा आशय पुढीलप्रमाणे, २२ अॉगस्ट रोजी आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्याची सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण नोंद झाली असून भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे हे या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी झाले होते. त्यांनीच गुंडांना व मुलांना बरोबर घेऊन स्वतः त्या युवकांवर प्राणघातक हल्ला केलेला आहे. जखमी झालेल्या व्यक्तींनी दिलेल्या फिर्यादीमध्ये उद्धव निमसे यांचे नाव स्पष्टपणे नमूद असूनदेखील अद्याप त्यांच्यावर ठोस कारवाई झालेली नाही, यावरून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे दिसून येते.

फिर्यादीच्या कुटुंबावर सध्या राजकीय दबाव व गुंडांचा दबाव टाकण्यात येत आहे, त्यामुळे त्यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे. ही घटना अत्यंत गंभीर असून लोकप्रतिनिधी राहिलेल्या व्यक्तीने स्वतः हल्ल्यात सहभागी होणे हे लोकशाही व्यवस्थेवर थेट आघात आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांना आश्रय देणे आणि सामान्य जनतेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणे असह्य आहे.

आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की, माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या हल्ल्यात सहभागी सर्व साथीदारांवरही तात्काळ कारवाई करण्यात यावी. फिर्यादीच्या कुटुंबाला तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे. राजकीय दबावाला बळी न पडता ही चौकशी पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने करण्यात यावी. आडगाव व परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक तो पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. मागण्या तात्काळ पूर्ण झाले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!