नाशिक – विशेष प्रतिनिधी
येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्यावतीने शनिवारी (दि.२०) संध्याकाळी ६ वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सभागृह, कालिदास कलामंदिर, येथे स्वप्ना प्रसाद लिखित, दिग्दर्शित ‘नामियाचा घास’ या बालनाट्याचे अभिवाचन आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रा.रविंद्र कदम यांनी दिली. या निमित्ताने नाट्य परिषदेच्या मासिक नाट्यअभिवाचन उपक्रमांतर्गत बालनाट्याचे अभिवाचन प्रथमच सादर होणार आहे.
या मासिक अभिवाचन उपक्रमात शुद्धेन भामरे, सान्वी भामरे, देवाशिष जगताप, आभास विंगळे, स्वरा कुलकर्णी, आदित्य कटारे, तनिष्क देशपांडे हे बालकलाकार अभिवाचन करणार असून या अभिवाचनास संगीत स्वप्ना प्रसाद यांचे असणार आहे.
सदर अभिवाचन उपक्रमाचे आयोजन सहकार्यवाह विजय शिंगणे तसेच श्रीया जोशी, श्रीराम वाघमारे या कार्यकारिणी सदस्यांनी केले असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. सदर अभिवाचनास रंगकर्मी, नाट्यरसिक प्रेक्षक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे यांनी केले आहे.

























