Homeशहर व जिल्हातिसरा श्रावणी सोमवार; रविवारी दुपारपासून सीबीएस परिसरातील वाहतुकीवर निर्बंध

तिसरा श्रावणी सोमवार; रविवारी दुपारपासून सीबीएस परिसरातील वाहतुकीवर निर्बंध

नाशिक – विशेष प्रतिनिधी
तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त तसेच ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी जाणाऱ्या हजारो शिवभक्तांना वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेने सीबीएस परिसरातील वाहतुकीत बदल केले आहे. हे बदल रविवारी (दि.१०) दुपारपासून ते सोमवारी (दि.११) रात्री आठ वाजेपर्यंत अंमलात राहतील.

पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने दि. ११ अॉगस्ट रोजी त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरी प्रदक्षिणेस जाणेसाठी नाशिक शहरातून व जिल्हयातून मोठ्या प्रमाणात भाविक ठक्कर बसस्टॅण्ड सिबीएस येथे येत असतात. मेळा बसस्टैंड ठक्कर बाजार येथुन त्र्यंबकेश्वर येथे ये-जा करण्यासाठी विशेष एसटी बस तसेच सिटी बसेसचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे ठक्कर बसस्टॅण्ड परिसरात मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते.

सदर मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होवु नये म्हणुन आम जनतेच्या सोयीसाठी दिनांक १० अॉगस्ट रोजी दुपारी दोन ते दिनांक ११ अॉगस्ट चे रात्री आठ वाजेपावेतो ठक्कर बसस्टॅण्ड परिसरातील तालुका पोलीस ठाणे, मेळा बसस्टॅण्ड ते मनसे कार्यालय ठक्कर बाजार (किशोर सुधारालयासमोरील रस्ता) सर्व प्रकारच्या वाहनांना (एसटी बस व सिटी बस वगळून) सर्वसाधारण वाहतुकीस प्रवेश बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

-: ‘प्रवेश बंद’, मार्ग :-

१) तालुका पोलीस ठाणे, मेळा बसस्टॅण्ड पासुन ते मनसे कार्यालय ठक्कर बाजार पावेतो (किशोर सुधारालय समोरील संपुर्ण रस्ता) जाणाऱ्या व येणाऱ्या रोडवर (एसटी बसेस / सिटी बसेस वगळून) इतर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.

-: ‘पर्यायी मार्ग ‘:-

– तालुका पोलीस ठाणे ते ठक्कर बाजारकडे जाणारी वाहतुक ही सीबीएस सिग्नल मोडक सिग्नल मार्गे जातील.

– ठक्कर बाजार मनसे कार्यालयाकडुन सिबीएसकडे येणारी वाहतुक ही मोडक सिग्नल सिबीएस मार्गे येतील.

वरील सर्व निर्बंध हे पोलीस सेवेकरीता असलेली वाहने, अग्निशमन दलाची वाहने व रुग्णवाहिका, अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागू राहणार नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!