Homeशहर व जिल्हाचॉईस नंबरच्या माध्यमातून एका दिवसात मिळाला नऊ लाख ३६ हजारांचा महसूल

चॉईस नंबरच्या माध्यमातून एका दिवसात मिळाला नऊ लाख ३६ हजारांचा महसूल

पंचवटी : सुनील बुनगे
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर आपल्याला मनासारखा आकर्षक नंबर मिळावा यासाठी अनेक हौशी वाहन मालक चॉइस नंबरसाठी आग्रही असतात. आकर्षक नंबरसाठी वाट्टेल ती रक्कम मोजतात. त्यातच ‘आरटीओ’ मध्ये चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू झाली असून, एका वाहन मालकाने ९००९ नंबरसाठी १ लाख ३१ हजाराची रक्कम जादा देत तो नंबर शासकीय फी सह दोन लाख ३१ हजार रुपयांत आपल्या वाहनासाठी नंबर घेतला.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) २६ ऑगस्ट २०२५ पासून चारचाकी वाहनांसाठी एम.एच. १५ के के ही नवीन मालिका सुरू झाली आहे. आकर्षक नंबरसाठी परिवहन कार्यालयात विहित केलेल्या शुल्काच्या रकमेच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त कोणत्याही बोलीच्या रकमेचा एक डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावा लागतो. त्यात ९००९ नंबरसाठी एकूण चार अर्ज सादर करण्यात आले होते. ९००९ नंबरसाठी शासकीय फी केवळ ७० हजार रुपये इतकी आहे. परंतू या नंबरसाठी जास्त अर्ज आल्याने त्यासाठी चारही वाहन मालकांनी वेगवेगळ्या अतिरिक्त रकमेचे डिमांड ड्राफ्ट दिले होते. त्यातील एका वाहन मालकाचा १ लाख ३१ हजाराचा अतिरिक्त डिमांड ड्राफ्ट होता.त्यामुळे त्या वाहन मालकाला ७० हजार शासकीय शुल्क आणि अतिरिक्त रक्कम असा २ लाख ३१ हजाराला ९००९ हा आकर्षक नंबर देण्यात आला. चारचाकी वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी एकूण १८६ अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्राप्त झाले होते.त्यात एकूण २६ आकर्षक नंबर साठी जास्त रकमेचे डिमांड ड्राफ्ट जमा झाले होते. त्यामाध्यमातून एकाच दिवसात प्रादेशिक परिवहन कार्यालयाला आकर्षक नंबरच्या माध्यमातून सुमारे ९ लाख ३६ हजारांचा अतिरिक्त महसूल जमा झाला. ही प्रक्रिया सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

चॉइस नंबरमधून वर्षाला मिळतात कोट्यवधी रुपये !

वाहन खरेदी केल्यानंतर अनेक वाहनचालक आपल्या वाहनासाठी चॉइस नंबरची मागणी करत असतात. दुचाकीसाठी विविध नंबरसाठी वेगवेगळी रक्कम असून तर चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळी रक्कम आकारली जाते. त्यात जर दुचाकीच्या सिरीजमधून एखाद्या चारचाकी वाहनासाठी नंबर घ्यायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त रक्कम मोजावी लागते. परंतू चारचाकी वाहनासाठी अथवा दुचाकी वाहनासाठी त्याच सिरीजमधून नंबर घ्यायचा असेल तर जे शासकीय शुल्क आहे तेच द्यावी लागते. जर एकाच चॉइस नंबरसाठी जास्त अर्ज आले तर त्यासाठी अतिरिक्त डिमांड ड्राफ्ट जो जास्त रकमेचा भरेल त्याला तो द्यावा लागतो. त्यातच शासनाने नुकतेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी शासकीय शुल्कात दुपटीने वाढ केली असली तरी हौशी वाहन मालक मात्र आकर्षक नंबर साठी वाट्टेल ती रक्कम मोजायची तयारी ठेवतात. त्यातून प्रादेशिक परिवहन विभागाला चॉइस नंबरच्या माध्यमातून वर्षभरात कोट्यवधी रुपये महसूल मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!