नाशिक – विशेष प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात विविध मंडळांचे देखावे पहाण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात शहर वाहतूक शाखेने ३१ अॉगस्ट ते पाच सप्टेंबर दरम्यान शहरातील प्रमुख मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहे. या कालावधीत काही मार्गावर वाहनांना प्रवेश बंद केले असून पर्यायी मार्गही सुचवले आहेत.
पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी या संदर्भातील अधिसूचना काढली असून सायंकाळी सहा ते रात्री १२ वाजेदरम्यान हे निर्बंध लागू असतील.
प्रवेश बंद मार्ग पुढीलप्रमाणे :-
– नाशिक शहरातील मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल कडून कालीदास कला मंदीर मार्गे सुंमगल कपडयाचे दुकान शालीमार चौकाकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजुने सर्व वाहनांसाठी जाण्या-येण्यास ‘प्रवेश बंद’ राहील.
– सीबीएस बाजु कडून गायकवाड क्लास, कान्हेरेवाडी मार्गे किटकॅट, सुमंगल कपडयाचे दुकानाकडे व सुमंगल कापड दुकानाकडुन कालीदासमार्ग व किटकॅटकडुन सिबीएस बाजुकडे ये-जा करणारी वाहतुकीस दोन्ही बाजुने सर्व वाहनांसाठी ‘प्रवेश बंद’ राहील.
– पंचवटी विभागातील सरदार चौक ते श्री. काळाराम मंदिर पावेतोचा रस्ता दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी ‘प्रवेश बंद’ राहील.
– पंचवटी विभागातील मालविय चौक ते गजानन चौक, गजानन चौक ते नागचौक, नाग चौक ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते मालविय चौक हे मार्ग दोन्ही बाजूने सर्व वाहनांसाठी जाण्या-येण्यास ‘प्रवेश बंद’ राहील.
– दिंडोरी नाका कडून मालेगांव स्टॅण्ड कडे ये-जा करणारी सर्व प्रकारची वाहतुकीस ‘प्रवेश बंद’ राहिल.
– मखमलाबाद नाका ते मालेगांव स्टॅण्ड ये-जा करणारी सर्व प्रकारची वाहतुकीस ‘प्रवेश बंद’ राहिल.
पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे :-
मोडक सिग्नल व खडकाळी सिग्नल येथून किटकॅट चौफुलीकडे येणारी व कालीदास कलामंदीरमार्गे सुमंगल कपडयाचे दुकानाकडे ये जा करणारी वाहने सारडा सर्कल, गडकरी सिग्नल, मोडक सिग्नलकडून सीबीएस सिग्नल या मार्गाचा वापर करतील.
– दिंडोरी नाक्याकडून मालेगांव स्टॅण्डकडे जाणारी वाहतुक ही पेठ नाका-बायजाबाई छावणी-रामवाडी- चोपडा लॉन्स मार्गे इतरत्र जातील.
– मखमलाबाद नाक्याकडून मालेगांव स्टॅण्ड कडे जाणारी वाहतुक ही पेठ नाका मार्गे इतरत्र जातील.
– तसेच, वाहनचालक हे गर्दीचे ठिकाणे सोडुन इतर तत्सम पर्यायी मार्गाचा वापर करतील.

























