– प्रकल्पग्रस्त शेतकरी एकवटले…
नाशिक – विशेष प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी पेयजल प्रकल्पात जात असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा शासन निर्णयाप्रमाणे भाव हा चुकीचा व कमी आहे. त्यामुळे योग्य भाव ठरवण्यात यावा तसेच शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले देण्यात यावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन त्र्यंबकेश्वर तहसीलदारांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी माजी आमदार नितीन भोसले, संपतराव सकाळे, बहिरु मुळाने, तानाजी बोडके, कैलास मिंदे, सुरेश मिंदे, गणपत आहेर, केरू आहेर, रावजी दिवे, मनोहर भाडमुखे, रमेश गांगुर्डे, निवृत्ती भिवसेन, सोमनाथ पोटिंदे, बाळकृष्ण कानकाटे, रामदास कानकटे, राजाराम ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रकल्पासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, शेतकऱ्यांना मोफत पाणी आरक्षित ठेवावे आदी मागण्याही करण्यात आल्या. काही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आठ अॉक्टोबर रोजी संमतीपत्र घेण्यात आले असून या प्रयत्नांना शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे तहसीलदार यांच्यासमोर नमूद करण्यात आले.

























