Homeशहर व जिल्हाद्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था; सेवानिवृत्ती पश्चात वाटचालीसाठी अग्रगण्य संस्था

द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था; सेवानिवृत्ती पश्चात वाटचालीसाठी अग्रगण्य संस्था

– उत्कृष्ठ नागरिक संस्था म्हणून गौरव…

नाशिक – विशेष प्रतिनिधी
सेवानिवृत्ती पश्चात वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून किंबहुना दैनंदिन कामात विरंगुळा म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था. ही संस्था ज्येष्ठांकरिता, ज्येष्ठांमार्फत, ज्येष्ठांची हित जपणारी अशी संस्था असून, संस्थेतर्फे सभासदांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा तसेच अध्यात्मिक विषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या संस्थेचे सभासद होण्यासाठी ज्येष्ठांची विशेष पसंती लाभली आहे.

महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) तर्फे अधिवेशनात उत्कृष्ठ नागरिक संस्था म्हणून द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. तर शहरातील इतर संस्थांनी देखिल द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचा गौरव केलेला आहे.

संस्थेतर्फे ज्येष्ठ नागरिक सभासदांची शहरातील नामांकित हॉस्पीटल, संस्थांतर्फे वैद्यकीय शिबीर घेवून सभासदांची आरोग्य तपासणी करण्यात येते. ऐतिहासिक तथा धार्मिक स्थळी सहलीचे नियोजन केले जाते. सभासदांच्या वाढदिवसानिमित्त दरमहा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून, त्या महिन्यात वाढदिवस असणाऱ्या सभासदांचा शुभेच्छा सत्कार करण्यात येतो. तर वय ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना स्नेहवस्त्र, शाल, गुलाबपुष्प देवून गौरविण्यात येते. दरवर्षी संस्थेतर्फे सभासदांसाठी दोन प्रकारचे स्नेहभोजनाचे प्रयोजन करण्यात येते, जेणेकरून त्यानिमित्ताने सभासद एकत्र येतात. एकमेकांचा परिचय होवून सुसंवाद साधला जातो. विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य, पराक्रम, विक्रम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते.

महिलादिनानिमित्त, सामाजिक सेवेत, उपक्रमात कार्यरत असणाऱ्या कर्तुत्ववान नारीशक्तीचा गौरव करण्यात येतो, महिलांसाठी हळदीकुंकू, तिळगुळ समारंभ करण्यात येतो. याशिवाय वाचन संस्कृती रूजवावी म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे ग्रंथ आपुल्या दारी या अभिनव योजने अंतर्गत संस्थेला ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली असून, सभासदांना वाचनासाठी पुस्तके दिली जातात. संस्थेचे सभासद, हितचिंतक तथा लोकप्रतिनिधी यांचेकडून देणगी व उपयोगी साहित्य भेटवस्तू मिळवून सहकार्य मिळते.

संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कुलकर्णी असून ॲड. पी.डी. काळे (उपाध्यक्ष), धनंजय चतुर (कार्याध्यक्ष), रघुनाथ कुलकर्णी (सचिव), जे.बी. घिया (कोषाध्यक्ष), अंबादास बुऱ्हाडे (सहसचिव), कुमुदिनी कुलकर्णी (सहकोषाध्यक्ष), शशिकांत उपासनी (ग्रंथपाल) व सहकारी द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या अविरत वाटचालीसाठी कटीबद्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महापौरांकडून भाजप नगरसेवकांवरच ‘अन्याय’; प्रभाग ३ मधील पाणीप्रश्नावरून स्वपक्षीय नेत्यांमध्ये जुंपली

पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील पाणीटंचाईचा प्रश्न आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाला आहे. भाजपच्या महापौर सौ. हिमगौरी आहेर (आडके)...

१० मार्चच्या मेगा शिबिरासाठी ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’ची जय्यत तयारी

0
- अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न पंचवटी । विशेष प्रतिनिधी दिंडोरी रोडवरील पंचवटी येथील मायको हॉस्पिटलमध्ये शुक्रवार, २७ फेब्रुवारी...

राजकीय पदार्पणातच अॅड. गौरव गोवर्धने ठरले ‘बाजीगर’ !

0
- पंचवटी विभागात घेतली सर्वाधिक मते... पंचवटी । विशेष प्रतिनिधी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीचे तरुण उमेदवार अॅड. गौरव गोवर्धने हे प्रथमच...

पंचवटीकरांनी नव्या चेहऱ्यांना दिले विक्रमी मतांचे पाठबळ

0
- गौरव गोवर्धने व दिपाली गीते यांचे दमदार पदार्पण... पंचवटी । विशेष प्रतिनिधी नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटी विभागात २४ पैकी २१ भाजपाने बाजी मारली....

‘म्हसरूळ परिसराचे घडवू या भविष्य….चला विजयी करु या धनुष्य’

0
- प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवारांची विजयाकडे आगेकूच पंचवटी - प्रतिनिधी महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१ अ),...

error: Content is protected !!